Exclusive:अजय देवगणसोबत 'तानाजी'मध्ये झळकणार काजोल

By  
on  

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री काजोल हिचा ‘दिलवाले’नंतर  जवळपास दोन-तीन वर्षांनी आता ‘हेलिकॉप्टर ईला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याच्या प्रोमोशन आणि इव्हेंट्ससाठी तिने खुप पुढाकार घेतला. नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणारी काजोल आता पुन्हा एकदा आपल्या सिनेमांकडे लक्ष केंद्रित करु लागली आहे.

‘हेलिकॉप्टर ईला’ या सिनेमात एका सिंगल मदरची भूमिका साकारणारी काजोल लवकरच एका आगामी प्रोजेक्टवर काम सुरु करतेय. पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार पती आणि निर्माता अजय देवगणच्या आगामी आणि बिग बजेट सिनेमा ‘तानाजी- द अनसंग’ वॉरियरमघध्ये काजोल झळकणार आहे.

सूत्रांनी पिपींगमून डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार, ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी’मध्ये काजोल या सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा तानाजी यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अजय  देवगणच तानाजी ही प्रमुख भूमिका साकारतोय. तसंच हा निर्णय खुद्द अजयनेच घेतल्याचं बोललं जात आहे. छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ योध्द्याची ही यशोगाथा अजय ‘तानाजी’ या सिनेमात मांडणार आहे. म्हणूनच ‘तानाजी’तील या मराठमोळ्या कनेक्शनसाठीच त्याने मराठीवर ब-यापैकी प्रभुत्व असणा-या पत्नी काजोललाच  कास्ट केलं आहे.

यापूर्वी अजय देवगण आणि काजोल ही जोडी अॅनिमेटेड ‘टुनपूर का सुपरहिरो’ या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते. त्यापूर्वी या दोघांनी ‘हलचल’ (1995), ‘प्यार तो होना ही था’ (1998), ‘राजू चाचा’ (2000) आणि ‘यू मी और हम’ (2008) या सिनेमांमधून आपली केमिस्ट्री दाखवून दिली.

 

आता इतक्या वर्षांनी अजय-काजोलला ऑनस्क्रीन पाहायला प्रेक्षक प्रचंड आतुर आहेत. अजय देवगण फिल्म्सची निर्मिती असलेला तानाजी हा बहुचर्चित सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

Recommended

Loading...
Share