By  
on  

Exclusive: ‘रंगबाज’ सीजन 2 मध्ये जिमी शेरगिलसोबत दिसणार झीशान आयुब

अभिनेता झीशान आयुब याने आजवर अनेक सिनेमांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारून रसिकांची वाहवा मिळवली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘आर्टिकल-15’, ‘मणिकर्णिका’,’अर्जुन पटियाला’  या सिनेमांमध्येही त्याने अभिनयाची चमक दाखवली आहे. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन मंगल’ मध्येही जीशान दिसणार आहे.

याशिवाय झी 5 च्या ‘रंगबाज’ च्या दुस-या भागातही तो जिमी शेरगिलसोबत झळकणार आहे. जिमी आणि झीशानसोबत या सिरीजमध्ये साकिब सलीम, तिग्मांशु धूलिया, अहाना कुमरा, रवि किशन आणि रणवीर शौरी हे कलाकार देखील दिसणार आहेत. 90 टक्के उत्तर प्रदेशच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेली ही सिरीज शिव प्रकाश शुक्ला यांच्या व्यक्तिरेखेच्या आसपास फिरते. या सिरीजचं दिग्ददर्शन भव धुलिया याने केला आहे. जिमी आणि झीशानने यापूर्वी ‘तनु वेड्स मनु रिटर्नस’ एकत्र काम केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive