Exclusive:दीपिका-रणवीर आणि प्रियंका-निक यांच्या लग्नाच्या तारखा क्लॅश होणार नाहीत

By  
on  

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानीच्या म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची सर्वजण आतुरतेने वाट पाहातायत. कधी तो शुभ दिवस उजाडतोय,असं चाहत्यांना झालं आहे. पण इथे बॉलिवूडकरांना एक वेगळीच चिंता लागून राहिली आहे. ती म्हणजे, देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची रिसेप्शन पार्टी व या बॉलिवूड कपलची पार्टी एकाच दिवशी असेल तर कसं जमणार बुवा. बॉलिवूडमध्ये मग दोन गट पडतील अशाने. कोण म्हणेल, हे बॉलिवूडकर रणवीर दीपिकाच्या बाजूचे तर दुसरे प्रियंका निकच्या.कोणाकडे हजेरी लावायची, राग-रुसवा आला तर. हे कोडंच होतं. पण आता यात टेन्शन घेण्याचं सेलिब्रिटींना काहीच कारण नाही.

महत्त्वाचं म्हणजे या लग्न सोहळ्याचं, प्रसिध्दी माध्यमांनासुध्दा कव्हरेजसाठी बरंच टेन्शन आलंय, धावपळ तर होणारच. पण आता सर्वचजण दोन पार्टी अटेंड करु शकतात. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी मुंबईत 1 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे तर प्रियंका व निकचं लग्न 2 डिसेंबरला उदयपूरच्या उम्मेद भवन येथे राजेशाही थाटात पार पडणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचे डेस्टिनेशन वेडींग इटली येथे होणार आहे. इटलीतील लेक कोमो येथे दीपिका –रणवीरचा लग्नसोहळा रंगणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच लग्नात दोघांच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असून हा फारच खासगी सोहळा असेल.

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या 2 डिसेंबरला होणा-या शाही विवाहसोहळ्यात बॉलिवूड आणि हॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Recommended

Loading...
Share