Exclusive: शाहरुखसोबत 'इंशाअल्लाह' करण्याचा संजय लीला भन्साळींचा कोणताही प्लॅन नाही

By  
on  

सलमान खान स्टारर आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात सलमान आणि भन्साळींच्या ट्विटनंतर कालपासून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे  'इंशाअल्लाह'चं भविष्य अंधातरीच दिसू लागलं आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूडकरसुध्दा ह्या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुक होते पण आता. भन्सालींनी हा सिनेमा पूर्णपणे स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. भन्साळी सलमानसोबत आता सिनेमा बनवत नाहीत हाच ह्याचा अर्थ होतो. यासंदर्भात काल त्यांनी एक ट्विटसुध्दा केलं. 

संजय लीला भन्साळी यांच्या भन्साली प्रोडक्शनतर्फेसुध्दा एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, की "सध्या तरी 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात पुढे जाण्याचं  भन्साळी प्रोडक्शनने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.तसंच पुढील घोषणा लवकरच होईल" असंसुध्दा स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच देवाची इच्छा असंसुध्दा नमूद केलं आहे. 

 

 

दरम्यान, बॉलिवूड किंग शाहरुख संजय लीला भन्साळींसोबत  'इंशाअल्लाह' करणार अशाही अफवा सुरु झाल्या, कारण 'झीरो'नंतर शाहरुखने कोणताच सिनेमा साईन केलेला नाही. पण पिपींगमूनला मिळालेल्.या सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी सारासर खोटी आहे. भन्साळी आपल्या स्क्रीप्टबाबत खुपच पझेसिव्ह आहेत आणि घाईगडबडीत तेकुठलेही निर्णय कधीच घेत नाही.तसंच शाहरुख व सलमान चांगले मित्र आहेत, त्यामुळे ते एकमेकांच्या प्रोजेक्टच्या आड कधीच येणार नाहीत. तर दुसरीकडे  भन्साळी शाहरुख सोबत इजहार नावाचा आगामी सिनेमा करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इंशाअल्लाह' मार्गी लागत नसल्याने ते शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटसोबत इजहारचं काम सुरु करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण आता भन्साळींचं नेमकं कोणतं प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर  येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share