By  
on  

Exclusive:आमिर म्हणाला,"श्रीदेवी मला खुप आवडायच्या,त्यांच्यासोबत हा सिनेमा करायचा होता"

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच दिवाळीत या वर्षातील सर्वात बिग बजेट सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाद्वारे तो प्रथमच बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतोय. हा अनुभव तर त्याच्यासाठी खुप अविस्मरणीय आहे. या सिनेमा संदर्भात बोलताना आणि एकूणच इतर विषयांवर गप्पा मारताना आमिरने एक मोठा खुलासा केला.

आमिर खान म्हणाला, "मला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी खुप आवडायच्या. मी सर्वप्रथम त्यांना अभिनेता झाल्यावर एका मॅगझिनच्या कव्हर शूट निमित्ताने भेटलो होतो. मुंबईतील सेंटॉर हॉटेलमध्ये आमची ही भेट ठरली होती. शूटदरम्यान माझ्या मनात अगदी चलबिचल सुरु होती. पण मनातून सुखावून गेलो होतो. पण तरीही मी श्रीदेवी यांच्या नजरेला नजर देणं कटाक्षाने टाळत होतो."

आमिर पुढे सांगतो, "माझ्या डोक्यात हे नेहमी पक्क होतं की, मला श्रीदेवी यांच्यासोबत कोणता सिनेमा करायचा आहे. हे मी आधीच ठरवलं होतं. 1953 सालची हॉलिवूड रोमॅंटीक कॉमेडी रोमन हॉलिडे याचा बॉलिवूड रिमेक करण्याची माझी इच्छा होती. राजघराण्यातली राजकुमारी आणि त्या देशातला न्यूज रिपोर्टर यांच्यावर आधारित ती कथा आहे. ती राजकुमारी कशी सर्व प्रोटोकॉल तोडून बाहेर फिरण्यास निघते आणि तिची भेट त्या रिपोर्टरसोबत होते. तो तिला ओळखतो. मग ते दोघे कसे रोम फिरतात आणि काय गमती-जमती घडतात. हे सिनेमात धमाकेदार पध्दतीने दाखवलं आहे." पण श्रीदेवी यांच्यासोबत हा सिनेमा करण्याचा योग कधी जुळूनच आला नाही, ती इच्छा अपुरी राहिली. अशी खंत आमिरने व्यक्त केली.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive