संगीत सोहळ्यात देसी गर्लला इम्प्रेस करण्यासाठी निक जोनास करतोय या गाण्याची तयारी

By  
on  

नवपरिणीत 'दीपवीर'चे कौतुकसोहळे थांबायचं नाव घेत नसतानाच बॉलिवूड आणखी एका लग्नसोहळ्यासाठी सिद्ध झालं आहे. हा सोहळा आहे देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा.... सध्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशातील स्थळांना प्राधान्य दिलं जात असताना प्रियांकाने मात्र विवाहासाठी जोधपूरची निवड केली आहे. आता या ग्लोबल कपलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

पिपींगमूनच्या हाती एक एक्सक्ल्युझिव्ह वृत्त नुकतंच आलं आहे, ते म्हणजे पीसीचा भावी पती निक जोनास त्यांच्या जोधपूर येथे होणा-या 29 नोव्हेंबरच्या संगीत सोहळ्याची जोरदार तयारी करतोय. सूत्रांनुसार हा अमेरिकन पॉप सिंगर आपल्या नववधूला इम्प्रेस करण्याची कोणतीच कसर सोडत नाहीय. हा सोहळा त्याला धमाकेदारच करायचाय. 2008 साली प्रदर्शित झालेल्या प्रियंका चोप्राच्या देसी गर्ल या सुपरहिट ट्रॅकवर निक खास परफॉर्म करणार आहे. तसंच तिचं गाणं तिनका तिनकावरही निक गिटार वाजवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान ेका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार निक फक्त गाणं आणि गिटार वाजवणं यावरच थांबणार नसून तो आपल्या देसी गर्लच्या जोडीने नृत्याच्या तालावर थिरकण्याचीसुध्दा पूर्ण तयारी करतोय.यासाठी तो बॉलिवूडचे प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडे नृत्याचे धडे घेणार आहे. या कार्यक्रमात निक प्रियांकाच्या 'गल्ला गुडियां' आणि 'पिंगा' या गाण्यावर थिरकेल.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रियांका आणि निकचा खास परफॉर्मन्स देखील असणार आहे. पीसीच्या लग्नासाठी बॉलिवूडकरांमध्ये उत्सुकता असली तरी तिने मात्र लग्न सोहळ्याला प्रसिद्धीपासून लांबच ठेवायचं ठरवलं आहे. पीसीच्या मते, तिचं लग्न हा अत्यंत खासगी सोहळा असल्याने इतर झगमगाटापेक्षा लांब असणं गरजेचं आहे. लग्नाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी अलीकडेच जोधपूरचा दौरा केला आहे.

Recommended

Loading...
Share