By  
on  

‘2.0’ चे निर्माते लायका स्वत: सेल्युलर ऑपरेटर असताना वाद का?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांचा मोस्ट अवेटेड 2.O हा सिनेमा प्रदर्शनाच्या काही तासांपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने या सिनेमाविरोधात तक्रार नोंदवली आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनऑफ इंडिया (COAI) यांच्या मते, शंकर दिग्दर्शित 2.O या सायन्स-फिक्शन सिनेमात मोबआईलचे अनेक नकारात्मक प्रभाव आणि मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम यांना मोठ्या प्रमाणात भासवण्यात आले आहे, जे पर्यावरणासोबतच मनुष्य आणि पशू-पक्ष्यांना प्रचंड हानी पोहचवते.

टेलिकम्युनिकेशन असोसिएशनने  2.O सिनेमा विरोधात सूचना व प्रसारण मंत्रालय आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन एक तक्राररीचं पत्र लिहलं आहे. मोबाईलचा वापर आणि मोबाईल टॉवर याविषयी जास्तीत जास्त नकारात्मक बाबी सिनेमात दाखवल्या गेल्या आहेत असं या तक्रार पत्रात म्हटलं आहे.जोपर्यंत सिनेनिर्माते या दृश्याविषयी समाधानकारक उत्तर देत नाहीत तोपर्यंत सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं केली आहे.

2.O हा सिनेमा आशियाखंडातील सर्वात बिग बजेट सिनेमा असून तो जवळपास 510 कोटींमध्ये तयार करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा 14 विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत असून प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोव-यात सापडलाय.

पिपींगमून तुम्हाला एक मात्र नक्कीच सांगू शकतो, 2.0 चे मेकर चेन्नईची लायका प्रोडक्शन्स ही युके येथील मोबाईल व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर लायका मोबाईलची सबग्रुप कंपनी आहे. ही मोबाईल कंपनी 24 देशांत उपलब्ध असून त्यांनीच पहिल्यांदा यूके येथे 2014 साली पहिल्यांदा 4G सेवा लॉन्च केली.

लायकामोबाइल चे सर्वेसर्वा , ब्रिटिश श्रीलंका तमिळ एन्टरप्रेनर आणि फिल्ममेकर अलिराजा सुबासकरण यांनी 2014 साली  ‘कत्थी’ सिनेमाद्वारे लायका प्रोडक्शन्सची सुरुवात केली . या प्रोडक्शनने आत्तापर्यंत तमिळ आणि तेलुगू सिनेमांची निर्मिती केली आहे.

आता हे लायका प्रोडक्शन 2.0 सिनेमांची निर्मिती करुन स्वत:च्याच बिझनेसला कसे नुकसान पोहचवतायत असा खडा सवाल रजनीकांत फॅन्सनी उपस्थित केला आहे.

https://youtu.be/_qOl_7qfPOM

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive