Exclusive: एटली नाही, तर राजकुमार हिरानींसोबत असणार शाहरुख खानचा पुढचा सिनेमा

By  
on  

बादशाह शाहरुख खानचे फॅन्स त्याच्या 54व्या वाढदिवसानिमित्त कोणती घोषणा करतो याकडे लक्ष लावून आहेत. पण त्याच्या फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण यादिवशी शाहरुख कोणतीही नवीन घोषणा करणार नाही. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख फिल्म मेकर एटली यांच्या सिनेमात दिसणार नाही. याशिवाय तो राजकुमार हिरानींच्या सिनेमात काम करणार असल्याचं समजत आहे. 

शाहरुखचा यापुर्वीचा सिनेमा ‘झिरो’ हा बॉक्स ऑफिसवर दणकून आपट्ला होता. यानंतर शाहरुखने कोणत्याही सिनेमाची ऑफर स्विकारली नव्हती. पण काही दिवसांपुर्वी एटली यांच्या सिनेमात काम करणार असल्याचं समोर येत होतं. याशिवाय राजकुमार हिरानींशीही त्याचं या संदर्भात बोलणं झालं होतं. शाहरुखला राजकुमार हिरानींच्या विनोदी सिनेमांची पटकथा जास्त पसंत पडल्याने त्याने या सिनेमाला होकार कळवल्याचं समजतं.

Recommended

Loading...
Share