By  
on  

शर्मिला टागोर यांनी सूनबाई अमृता सिंहला दिली कौतुकाची थाप

येत्या काही दिवसात आणखी एक स्टार किड बॉलिवूडच्या जगात नशीब आजमावणार आहे ती म्हणजे सारा अली खान. 'केदारनाथ' या सिनेमातून सारा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई - वडिलांचं ग्लॅमर अनुभवत मोठी झालेल्या साराचं आजी आणि सदाबहार ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरनेही कौतुक केलं आहे.

याबद्दल विशेषकरून 'पीपिंगमून डॉट कॉम'शी बोलताना सारा म्हणते, 'आजीने आईला केलेल्या टेक्स्ट मेसेजने माझा आनंद वाढवला आहे.' माझी आई आणि आजी एकमेकींशी फारशा संपर्कात नाहीत. पण अम्माने केलेल्या मेसेजने दोघींमध्ये संवाद झाला याचा आनंद आहे.' या मेसेजमध्ये शर्मिला यांनी अमृताचं कौतुक केलं आहे. त्या म्हणतात, ' साराच्या पहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा. तू तिचं उत्तम संगोपन केलं आहेस. त्यामुळेच आज ती जगासमोर आत्मविश्वासाने उभी राहू शकते. दोघींना अनेक आशीर्वाद , अम्मा.'

1991 मध्ये सैफ आणि अमृताचं लग्न झालं तेव्हा सैफच्या आई- वडिलांनी या लग्नाला तीव्र विरोध केला होता. या पाठीमागे दोघांच्या वयात असलेलं अंतर हे मुख्य कारण होतं. कारण लग्नावेळी सैफ 21 वर्षांचा होता तर अमृता 33 वर्षांची होती. तेव्हापासून अमृता आणि शर्मिला यांच्यामध्ये अजिबात संवाद नव्हता. पण आता साराच्या निमित्ताने का होईना ही दरी सांधताना दिसत आहे. सारा 'कॉफी विथ करण'मध्ये आली होती त्यावेळी देखील शर्मिला यांनी तिला मेसेज करून शुभेच्छा दिल्या होत्या.

 

साराच्या पहिल्या वहिल्या सिनेमासाठी सैफ, अमृता, करीना यांच्यासोबतच आत्या सोहा आणि आजी शर्मिलादेखील खूप उत्साहात आहेत. केदारनाथ पडद्यावर कितपत यशस्वी ठरतो हे लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive