Exclusive:करण जोहरने इच्छाधारी सुपरहीरो भूमिकेसाठी रणवीर सिंहला अप्रोच केलंच नाही

By  
on  

‘बॅटमॅन’,‘सुपरमॅन’,‘आयर्नमॅन’,‘कॅप्टन अमेरिका’यांसारख्या  सुपरहिरोंची क्रेझ आपल्याकडे नवीन नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच ह्या सिरीज जबरदस्त एन्जॉय करतात. आता बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता करण जोहर देखील एक सुपरहिरो चित्रपट मालिका तयार करण्याची तयारी करतोय. या चित्रपटांसाठी त्याने सुपरहिरो म्हणून  बॉलिवूडचा ऑलराऊंडर अभिनेता रणवीर सिंहची निवड करण्यात आल्याच्या बातम्या सध्या काही वेबसाईट्सने प्रसिध्द केल्या आहेत. 

परंतु रणवीर सिंह किंवा करणच्या धर्मा प्रोडक्शन तर्फे या वृत्ताला कुठलाच दुजोरा मिळालेला नाही. त्यांनी आपल्या सोशल मिडीयावरसुध्दा याबाबत कुठलीच माहिती दिलेली नाही. पिपींगमूनला मिळालेल्या वृत्तानुसार धर्मा प्रोडक्शन रणवीरसह असा कोणताच सिनेमा तयार करण्याच्या विचारात नाही. 

 राज कॉमिक्सचे सहसंस्थापक गुप्तांच्या म्हणण्यानुसार, आम्ही रणवीर सिंह आणि करण जोहरसह चर्चा करतोय. जर ही चर्चा यशस्वी ठरली तर हा नागराज कॉमिकवर आधारित सुपरहिरो सिनेमा पुढील वर्षी म्हणजे 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.  
 

Recommended

Loading...
Share