अलीकडे कलाकार त्यांच्या आजाराविषयी खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. सैफ अली खानची सारा अली खाननेही अलीकडेच तिच्या आजाराविषयी करणच्या शोमध्ये सांगितलं.
साराने या तिच्या पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हरीअन सिंड्रोम)ला समर्थपणे दिलेल्या लढ्याविषयी सांगितलं. एकेकाळी साराचं वजन ९६ किलो इतकं झालं होतं. त्यामुळे तिला पीसीओडी सारख्या विकाराला सामोरं जावं लागलं होतं. पण साराने नियमित उपचार आणि व्यायामाच्या सहाय्याने त्यावर यशस्वीपणे मात केली. तेव्हापासून वर्क आउट करण्याबाबत सारा कमालीची दक्ष असते. अनेकदा तिने वर्कआउट करतानाचे फोटोही सोशल मिडियावर अपलोड केले आहेत.
सारा म्हणते, पीसीओडीपासून बचावासाठी वर्कआउट हा सर्वोत्तम पर्याय आहे. सारा फुडी आहे त्यामुळे खाल्लेलं रिचवण्यासाठी जिमला जाणं तिच्यासाठी मस्ट आहे.साराच्या डाएट्मध्ये जंक फूडला अजिबात स्थान नाही. तिला घरी बनवलेलं जेवण विशेषत्वाने आवडतं.
याशिवाय तिच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश मुख्यत्त्वाने असतो. इडली, दाल-राईस, चपाती, भाजी, सलाड अशा पदार्थांचा समावेश तिच्या आहारात असतो. सारा हिरव्या पालेभाज्या आवर्जून खाते. याशिवाय स्विमिंग, डान्सिंग आणि किक बॉक्सिंगने ती स्वत:ला फिट ठेवते.