By  
on  

Exclusive: 'मिशन मंगल'चा दिग्दर्शक जगन शक्तीची झाली ब्रेन क्लॉट सर्जरी

'मिशन मंगल' हा मल्टीस्टारर सुपरहीट सिनेमा रसिकांसमोर आणणारा नवोदित दिग्दर्शक जगन शक्तीवर आज  ब्रेन क्लॉट सर्जरी झाल्याची एक्स्क्ल्युझिव्ह माहिती पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आली आहे. कोकिलाबेन धिरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी पार पडली असून जगनवर तेथेच उपचार सुरु आहेत. 

सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार, ही सर्जरी  65-70% यशस्वी झाली असल्याचं म्हटलं जात असून त्याला आता सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे. शनिवारी जगनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुक्रवारी मित्रांसोबत फिरत असताना तो अचानक कोसळला. त्याची शुध्द हरपली होती. 

जगनचा दिग्दर्शकीय पदार्पणातील मिशन मंगल हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षाी सिन्हा, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी आणि नित्या मोहन अशी मल्टिस्टारकास्ट असलेला हा सिनेमा स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive