बॉलिवूड भाईजान सलमान खानचे चाहते त्याच्या सिनेमांवर अक्षरश: जीव ओवाळून टाकतात. त्याच्या सिनेमांची एक झलक पाहण्यासाठी जणू ते नेहमीच आतुर होतात. आता सलमानचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'भारत' हा सिनेमा ईद 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. पण तत्पूर्वी सलमानच्या नुकत्याच साजरा झालेल्या वाढदिवसाला म्हणजे 27 डिसेंबरला त्याच्या चाहत्यांना या सिनेमाच्या टीझरची वाढदिवसानिमित्ताने एक झलक पाहायला मिळेल अशी अशा होती. पण अखेर ती फोलच ठरली.
पण 'भारत'च्या टीमने आता काहीतरी मस्त प्लॅन केलं आहे. नवीन वर्षात एका खास तारखेला नवीन सिनेमावर चर्चा करुया असं प्रॉमीस मागच्याच महिन्यात दिग्दर्शक अली अब्बास झफरने केले होतं.पिपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, भारतचा टीझर दिग्दर्शक अली अब्बास झफर प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारी रोजी प्रदर्शित करतोय. या दिनाचं औचित्य साधत हा टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय 'भारत'च्या टीमने घेतला आहे. सध्या या टीझरच्या एडीटींगचं काम जोरात सुरु आहे.
या टीझरमध्ये सलमानच्या चाहत्यांना जे हवं आहे,ते सर्वकाही दडलंय. जबरदस्त कथानक आणि सलमानची जादू यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तसंच या टीझरमध्ये दमदार संवाद आणि एकापेक्षा एक दृश्यांचा नजराणा असेल. त्यापैकी 'जानते हो मेरे मॉं-बाबाने मेरा नाम भारत क्यू रखा है' हा एक सलमानचा सिनेमातील संवाद असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच 'भारत' हा वस्तववादी सिनेमा आहे.
'भारत' सिनेमा हा 2014 साली आलेल्या एका कोरियन सिनेमा 'अॅन औड टु माय फादर'चा अधिकृत अॅडप्शन आहे. यात सलमान आणि कतरिनासोबतच दिशा पटानी, तबू , जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी आणि नोरा फतेही यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.