Exclusive:'इंडियन 2'मध्ये अक्षय कुमार खलनायक साकारणार नाही,वाचा कारण

By  
on  

काही दिवसांपासून बॉलिवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतले प्रसिध्द दिग्दर्शक शंकर यांच्या इंडियनच्या सिक्वलमध्ये खलनायक साकारणार अशी चर्चा होती. पण यात काहीच तथ्य नाही. ह्या निव्वळ अफवा होत्या.

पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार,अभिनेते कमल हसन यांच्या अपोझिट दिग्दर्शक शंकर यांची पसंती फक्त आणि फक्त अक्षय कुमारलाच होती. पण तारखा नसल्याने अक्षयने ही भूमिका नाकारली आणि तसंही यापूर्वी रजनीकांतच्या 2.0 मध्ये अक्षय नकारात्मक व्यक्तिरेखेत झळकला होता, त्यामुळे पुन्हा त्याला ही नकारात्मक शेड नको होती.

महत्तवाचं म्हणजे यंदा अक्षयचे चार चार सिनेमेप्रदर्शित होणार आहेत. केसरी, मिशन मंगल,‘हाउसफुल 4’, ‘गुड न्यूज़’ हे ते बहुचर्चित सिनेमे आहेत. तसंच दिग्दर्शक शंकरने या सिनेमासाठीच शंकरने पोलिस व्यक्तिरेखेसाठी सिंघम अजय देवगणला विचारलं होतं, पण त्यानेसुध्दा इतर वर्क कमिटमेंट्समुळे नाकारला. त्याला शंकरसोबत काम करायचंय पण पुन्हा पोलिसाची भूमिका साकारायची नाही.

Recommended

Loading...
Share