EXCLUSIVE : आयुष्मान खुराना दिसणार स्त्रीरोग तज्ज्ञाच्या भूमिकेत, सिनेमाचं नाव असेल ‘स्त्री रोग विभाग’ 

By  
on  

नुकताच प्रदर्शित झालेला कॉमेडी ड्रामा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ सिनेमात अभिनेता आयुष्मान खुरानाने असामान्य भूमिका साकारली. या सिनेमात त्याची भूमिका एका गे मुलाची असून सिनेमात समलिंगी प्रेमकथा दाखवण्यात आली. मात्र पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुरानाने नुकताच आणखी एक सिनेमा साईन केला आहे. या सिनेमात आयुष्मान एका स्त्रीरोग तज्ज्ञाच्या भूमिकेत असून एका मुलीला केलेल्या मदतीमुळे सिनेमातील पात्राच्या वैद्यकीय करियरच्या प्रतिष्ठेला कसं वळण मिळतं हे या सिनेमात आहे.  


  नुकतीच बॉलिवुडमध्ये डेब्यू करणारी अलाया फर्नीचरवाला जिने ‘जवानी जानेमान’ या सिनेमात सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली, तीच अलाया या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

जंगली पिक्चर्ससोबतचा आयुष्मानचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी आयुष्मानने जंगली पिक्चर्ससोबत 2017मध्ये ‘बरेली की बर्फी’ आणि 2018 मध्ये ‘बधाई हो’ हे सिनेमे केले आहेत. या प्रोडक्शन हाउसच्या अंतर्गत क्रिटीक्सनी गौरवलेले ‘तलवार’, ‘दिल धडकने दो’, ‘राझी’ या सिनेमांचा समावेश आहे. पिपींगमूनला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार आयुष्मानच्या या आगामी सिनेमाचं नाव ‘स्त्री रोग विभाग’ असं असणार आहे. हा सिनेमा एक बोल्ड आणि वेगळा प्रोजेक्ट असून महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यावर भाष्य करेल, ज्या पद्धतीच्या सिनेमांसाठी सध्या अभिनेता आयुष्मान खुरानाची ओळख आहे. अनुराग कश्यप यांची बहीण अनुभूती कश्यप हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून सौरभ भारत यांनी हा सिनेमा लिहीलाय. अनुभूतीने याआधी ‘मोई मरजानी’ हा लघुपट केला होता. शिवाय नुकतच ‘अफसोस’ नावाची वेब सिरीजही केली होती. या सिनेमाच्या निमित्ताने अनुभूती ही आयुष्मानसोबत तिचं बिग स्क्रिन डेब्यू करणार आहे.


 ‘स्त्री रोग विभाग’ हा सिनेमा याचवर्षी चित्रीत होणार आहे. अनुभव सिन्हा यांच्या ‘अनेक’ या सिनेमाचं एप्रिलमध्ये चित्रीकरण केल्यानंतर आयुष्मान या सिनेमाचं चित्रीकरण करेल. शिवाय आयुष्मान हा करण जौहरच्या धर्मा प्रोडेक्शनसोबतही स्पाय थ्रिलर करणार असल्याचं बोललं जातय. सध्या आयुष्मान चार महिन्यांच्या सुट्टीवर आहे. मात्र आगामी येणाऱ्या या सिनेमांमधून आयुष्मान पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share