बॉलिवूड भाईजान सलमान खान लवकरच टायगर फ्रेंचायझीच्या 3 भागासह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह माहितीनुसार सलमान सध्या एक्शनपॅक राधेच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण ‘कभी ईद कभी दिवाली’नंतर तो लगेचच पुढच्या वर्षी फेब्रुवारीत यशराज फिल्म्सच्या ‘टायगर 3’ च्या शूटींगला सुरुवात करणार आहे.
सर्वात आधी सलमान ‘किक 2’ च्या शूटींगचा श्रीगणेशा करणार होता, परंतु स्क्रीप्ट फायनल न झाल्याने तो प्रोजेक्ट सध्या होल्डवर पडला. त्यामुळेच आता टायगर फ्रॅंचायझीसाठी सलमानलाअवधी मिळतोय. सूत्रांच्या अनुसार आदित्य चोप्राने सिनेमाचा बेसिक प्लॉट लॉक केला आहे व सिनेमाच्या कथेवर काम करतोय. हा 3 रा भाग या सिनेमाचा शेवटचा भाग असून तो आधीच्या दोन्हीपेक्षा मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येणार आहे. पहिल्या दोन सिरीज प्रमाणेच या शेवटच्या सिरीजमध्येसुध्दा कतरिना कैफ आयएएस एजंटच्या भूमिकेत पाहायला मिळेल.
‘टायगर जिंदा है’च्या तिस-या भागाचं दिग्दर्शन मात्र अली अब्बास जफर करु शकणार नाहीत. कारण, नोव्हेंबरमध्येच तो मिस्टर इंडीयाच्या ट्रिव्होलॉजीवर काम सुरु करतोय. त्यामुळे निर्माते दिग्दर्शकाच्या शोधात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यशराज कबीर खानकडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवू शकतात असंही सूत्र सांगतात.