By  
on  

Exclusive: इव्हेंट मुंबई पोलिसांचा पण चर्चा अक्षयकुमारच्या स्टंटची

स्टंटबाजी आणि अक्षय कुमार यांचं नातं फार जुनं आहे. अक्षयला त्यामुळेच बॉलिवूडचा खरा खिलाडी म्हटलं जातं. अक्षयच्या या स्टंट्चा प्रत्यय अलीकडेच आला. पोलिस कल्चरल एव्हेंट ‘उमंग २०१९’ अलीकडेच पार पडला. यामध्ये  अक्षयने अ‍ॅक्शनपॅक्ड परफॉर्मेन्स केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्या स्टंट्सचं कौतुक केलं.

या स्टंट्च्या सुरुवातील अक्षय १२ मजल्यांच्या इमारतीवरून खाली उतरतो. तो उतरल्या क्षणी राष्ट्रगीत सुरु होतं. राष्ट्रगीतामुळे तिथलं वातावरण देखील भारल्यासारखं झालं होतं. अक्षयला अशा स्टंट्ससाठी प्रेरणा कुठुन मिळते हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमी सतावत असतो. अक्षयच्या या स्टंट्मागे प्रेरणा होते इंस्पेक्टर आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक. दया नायक सध्या आंबोलीमध्ये कार्यरत आहेत.

दया यांच्या आयडियावर अक्षयने अधिक काम केलं. त्यानंतर आगामी सुर्यवंशी सिनेमातील गेटअप करून हा स्टंट नीट पार पाडला. अक्षय त्याच्या आगामी सुर्यवंशी सिनेमात पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसून येत आहे. या स्टंट दरम्यानच अक्षय इतर २० पोलिसांसोबत बाईकने जात असताना रोहित शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग देखील अक्षयला जॉईन करतात.

पीपिंगमूनशी बोलताना दया यांनी अक्षयच्या या स्टंटचं क्रेडिट घ्यायला नकार दिला आहे. त्यावेळी त्यांनी अक्षयने पोलिसांसाठी दाखवलेल्या दिलेरीसाठी त्याचे आभार मानले आहेत. दुसरीकडे अक्षयनेही पीपिंगमूनशी बोलताना हे स्पष्ट केलं की या स्टंट मागची प्रेरणा दयाच आहेत. मुंबई पोलिस माझ्यासाठी गर्व आणि आभिमान आहेत. त्यामुळे हा ड्रेस मी सिनेमापुरता घालत असलो तरी माझ्या मनात या ड्रेसविषयी अत्यंत आदर आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive