Exclusive: ‘हिंदी मिडियम २’ मध्ये इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका मदान

By  
on  

मागील काही दिवसांपुर्वी पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार इरफानच्या खानच्या कॅन्सरवरील उपचार अंतिम टप्प्यात आला असून तो लवकरच शुटिंगला सुरुवात करणार आहे. इरफान या वर्षाअखेरीस ‘हिंदी मिडियम २’च्या शुटिंगला सुरुवात करेल असं बोललं जात आहे. या सिनेमाच्या कास्टींगला सुरुवात झाली आहे. निर्माते दिनेश विजान आणि भुषण कुमार या सिक्वेलच्या तयारीला लागले आहेत.

या सिनेमात ‘पटाखा’ फेम राधिका मदान इरफानच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज यांच्या सिनेमातून डेब्यु करणा-या राधिकासाठी इरफानसोबत काम करायला मिळणं ही पर्वणी आहे.

इरफान ‘हिंदी मिडियम २’ मध्ये दिल्लीस्थित व्यावसायिक राज बत्राच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात दिसलेली अभिनेत्री सबा कमर आणि दिशिता सहगल मात्र या सिक्वेलचा भाग नसणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करीना कपूर खान हिला या सिनेमाविषयी विचारण्यात आलं आहे. पण तिच्याकडून अजून कोणताच प्रतिसाद आला नाही.

‘मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेतून रसिकांसमोर आलेल्या राधिकाचा हा दुसरा सिनेमा आहे. ती इरफानच्या टीनएज मुलगी पियाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. भारतीय शिक्षण पद्धतीचा फ्रेश टेक या सिनेमात बघायला मिळेल. या सिनेमाचं प्री प्रॉड्क्शन सुरु झालं असून एप्रिलमध्ये सिनेमा फ्लोअरवर जाईल.

 

Recommended

Share