By  
on  

EXCLUSIVE : फ्रेडी दारुवाला आणि त्याचं कुटुंब सेल्फ क्वारंटाईनमध्ये, जवळच्या नातेवाईकाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह 

गायिका कनिका कपूरनंतर झोआ मोरानीश, वडिल करीम मोरानी आणि बहिण शाझा मोरानी यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटीव्ह आली होती.सलमान खानच्या ‘रेस-3’ सिनेमातील कोस्टार फ्रेडी दारूवाला यालाही कोरोना झाल्याची अफवा सुरु होती. मात्र पिपींगमूनला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  फ्रेडी दारूवाला याला कोरोना झाला नाही हे समोर आलय. जेव्हा पिपींगमूनने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा फ्रेडी म्हटला की, “ सध्या काही ठिकाणी माझी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे मात्र हे सत्य नाही. आमच्या जवळच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे. आणि म्हणूनच एक जबाबदार नागरीक म्हणून मी आणि माझा परिवार सध्या मुंबईतील घरात सेल्फ क्वारंटाईन आहोत."


  फ्रेडी हा अभिनेता आणि मॉडेल म्हणून काम करतो. सलमान खानच्या ‘रेस-3’ या फिल्मसह त्याने ‘हॉलिडे’, ‘फोर्स-2’ आणि ‘कमांडो-2’ इत्यादी सिनेमांमध्ये कामं केली आहेत.
 

Recommended

PeepingMoon Exclusive