ठरलं तर ! आमिरने केली 'लाल सिंह चढ्ढा'ची घोषणा, या हॉलिवूडपटाचा आहे हिंदी रिमेक

By  
on  

आज बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा 54 वा वाढदिवस त्याने सालाबादप्रमाणे प्रसिध्दी माध्यमांसोबत तो साजरा केला. यानिमित्ताने त्याने आपल्या चाहत्यांना एक आनंदवार्ता दिलीय ती म्हणजे हॉलिवूड सिनेमा 'फॉरेस्ट गम्प्स'चा हिंदी रिमेक घेऊन तो येतोय. तसंच या सिनेमाचं नाव 'लाल सिंह चढ्ढा' असं ठेवण्यात आलं आहे. वाढदिवसानिमित्ताने आमिरने नव्या सिनेमाची घोषणा केल्याने चाहते भलतेच खुश आहेत.

आमिरने 'फॉरेस्ट गम्प्स' या हॉलिवूडपटाचे हक्क विकत घेतल्याच्या बातम्या ब-याच दिवसांपासून व्हायरल होत होत्या. अखेर आमिरने आज या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.'लाल सिंह चढ्ढा' सिनेमात आमिर एक शीख व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार असून त्याने यासाठी बरंचसं वजनसुध्दा कमी केल्याचं समजतंय. मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी 'लाल सिंह चढ्ढा'ची कथा लिहली आहे. लवकरच सप्टेंबर 2019 मध्ये हा सिनेमा फ्लओअरवर जाणार आहे.

'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमाचं दिग्दर्शन सिक्रेट सुपरस्टार फेम दिग्दर्शक अद्वैत चंदन करणार असून आमिर खान प्रोडक्शन आणि वायाकॉम 18 या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळतोय.

'लाल सिंह चढ्ढा' हा ज्या 'फॉरेस्ट गम्प्स' सिनेमावर आधारित आहे, तो रोमॅण्टीक कॉमेडी सिनेमा अभिनेता टॉम हंकच्या बहारदार अभिनयाने सजला होता. या सिनेमाला त्यावर्षी तब्बल सहा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Recommended

Share