By  
on  

PeepingMoon Exclusive:  सुशांतच्या दारू आणि नशेच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीचं प्रसिध्दी माध्यमाने आपल्या 'ब्लाइंड आइटम' मध्ये दिले होते संकेत

 चांगलं आयुष्य जगणारा आणि एक चांगली इमेज असणारा अभिनेता म्हणून सुशांत सिंह राजपूत त्याच्या चाहत्यांना परिचीत होता. मात्र त्याचं आयुष्य अंधकारात आणि ड्रग्ज, नैराश्येमध्ये बुडालं असल्याचं काही कालावधीपूर्वी समोर आलं होतं. असं बोललं जात आहे की तो सध्याच्या कोव्हिड-19च्या परिस्थितीत विचलीत होता आणि त्याच्या अंधकाराने त्याला या सकाळी आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्याला मार्गदर्शनाची गरज होती पण त्याचं कुणीही शुभचिंतक नव्हतं.


एका बॉलिवुड साईटने त्याच्यावर ‘ब्लाईंड आयटम’ केलं होतं. जे त्याच्या करियर आणि खासगी आयुष्यातील अडचणींकडे इशारा करणारं होतं. त्यात असा उल्लेख होता की, काही सुपरहीट सिनेमे दिल्यानंतर त्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे सुशांतच्या वाट्याला मोठे सिनेमे येत नव्हते. यात असाही उल्लेख करण्यात आला होता की, सुशांतच्या दारु आणि नशेत सुरु असलेल्या त्याच्या जीवनशैलीमुळे त्याचं बांद्रामधील घर रिकामं करण्याच्याही सुचना त्याला देण्यात आल्या होत्या.
 

Recommended

PeepingMoon Exclusive