By  
on  

Exclusive: Its Confirm ! अक्कीसोबत ‘सुर्यवंशी’मध्ये कतरिनाची वर्णी

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती केवळ अक्षय कुमारची. अक्षयच्या केसरीची चर्चा सर्वत्र आहे. त्यातच त्याचा आगामी ‘सुर्यवंशी’ रोहित शेट्टी दिग्दर्शित करणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या यशाची खात्री त्याच्या रिलीजपासून आहे. अक्षय या सिनेमात एसीपी वीर सुर्यवंशीच्या व्यक्तिरेखेत दिसत आहे. या सिनेमाची हिरॉईन कोण असणार याची चर्चा रंगली होती. या सिनेमात अक्षयसोबत जॅकलीन झळकणार असल्याचं बोललं जात होतं. पण ‘पीपिंगमून’ला मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात अक्षयसोबत कतरिना झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कॅट आणि अक्कीने आतापर्यंत बॉलिवूडला ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. या आधी २०१० मधील ‘तिस मार खान’ हा चित्रपट अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा शेवटचा एकत्र चित्रपट होता.

अक्षयसाठी कतरिना लकी लेडी सिद्ध झाली आहे. सध्या कतरिनाचं करीअरही काहीसं उताराला लागलेलं आहे. त्यामुळे अक्षयसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं ही तिच्यासाठीदेखील लॉटरी आहे. कतरिना पीपिंगमूनसोबत बोलताना म्हणते, अक्षय माझ्या बॉलिवूडच्या आतापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाचा भाग आहे. त्याने ‘नमस्ते लंडन’ सिनेमावेळी दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी महत्त्वपुर्ण बाब होती.’ या दोघांचे फॅन्सही यांना तब्बल ९ वर्षानंतर एकत्र पाहायला उत्सुक असतील.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive