Exclusive: ‘हिंदी मिडियम २’मध्ये इरफानसोबत दिसणार करीना कपूर

By  
on  

इरफान खान भारतात आल्यानंतर ‘हिंदी मिडियम २’च्या शुटिंगला सुरुवात करणार हे आम्ही तुम्हाला या आधीच सांगितलं होतं. पण ‘हिंदी मिडियम २’ च्या नायिकेबद्दल कोणतीही बातमी समोर आलेली नव्हती. पीपिंगमूनच्या विश्वसनीय सुत्रांनुसार करीना कपूर खान आता या सिनेमात झळकणार आहे. सिनेमाच्या लंडनमधील शुटिंगला सुरुवात झाल्यानंतर करीना टीमला जॉईन करणार आहे. या सिनेमात ‘पटाखा’ फेम राधिका मदान इरफानच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. इरफान ‘हिंदी मिडियम २’ मध्ये दिल्लीस्थित व्यावसायिक राज बत्राच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात दिसलेली अभिनेत्री सबा कमर आणि दिशिता सहगल मात्र या सिक्वेलचा भाग नसणार आहेत. भारतीय शिक्षण पद्धतीचा फ्रेश टेक या सिनेमात बघायला मिळेल. या सिनेमाचं प्री प्रॉड्क्शन सुरु झालं असून एप्रिलमध्ये सिनेमा फ्लोअरवर जाईल.

Recommended

Loading...
Share