EXCLUSIVE : ही नृत्यांगना होती सरोज खान यांची आवडती, संभावना सेठचे मास्टरजींनी केलं होतं कौतुक

By  
on  

अभिनेत्री, नृत्यांगना संभावन सेठला सरोज खान यांच्या निधनाने धक्का बसला आहे. बऱ्याच रिएलिटी शोच्या निमित्ताने संभावनाला सरोज खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या रिएलीट शोमध्ये पहिल्यांदा सरोज खान यांच्यासोबत भेट झाली होती. "माधुरीनंतर माझं डान्सिंगमध्ये कुणी आवडत असेल तर ती तू आहेस" असं म्हणून सरोजजींनी संभावनाचं कौतुक केलं होतं. पिपींगमूनला दिलेल्या मुलाखतीत संभावनाने सरोज खान यांच्यासोबतच्या  बऱ्याच आठवणींना उजाळा दिला आहे.

संभावना सांगते की, "माधुरीनंतर माझं डान्सिंगमध्ये कुणी आवडत असेल तर ती तू आहेस" असं म्हणून सरोजजींनी माझं  कौतुक केलं होतं. बऱ्याच रिएलिटी शोमध्ये त्यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांच्यासोब चांगली बॉडिंग झाली होती. माझ्या घरी गणपतीतही त्या यायच्या. त्यांनी कधीही तुमचं टॅलेट तुमच्या डोक्यावर चढू दिलं नाही. त्याि तुम्हाला जमीनीवर ठेवतात. मी डान्सर होती मात्र मला पूर्ण त्यांनी केलं. खूप कमी काम करूनही मी त्यांच्याकडून खूप काही शिकले."

Recommended

Loading...
Share