By  
on  

सलमानचा ‘इन्शाअल्लाह’ आणि अक्षयचा ‘सुर्यवंशी’ यांचा होणार सामना

बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर ही बॉलिवूडसाठी नवीन बाब नाही. पण हे सिनेमे मातब्बर कलाकारांचे असतील तर मात्र चुरशीची स्पर्धा दिसून येते. काही सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्शाअल्लाह आणि सुर्यवंशी हे सिनेमे एकाच दिवशी म्हणजे २०२०च्या ईद दिवशी रिलीज होणार आहेत.

पण काही वेबसाईटच्या मते, सुर्यवंशी इतर कोणत्याही दिवशी रिलीज होऊ शकतो. पण इन्शाअल्लाह ईदशिवाय इतर दिवशी रिलीज झाल्यास सलमानचे फॅन्स नाराज होण्याची शक्यता असल्याने सुर्यवंशीची रिलीज डेत पुढे ढकलल्याचं बोललं जात होतं. पण सुर्यवंशीच्या टीममधील विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने पीपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार इन्शाअल्लाहसाठी सुर्यवंशीची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा रोहीत आणि टीमचा कोणताही विचार नसल्याचं बोललं जात आहे. खरं तर इन्शाअल्लाहची घोषणा होण्यापुर्वी सुर्यवंशीचं पोस्टर रिलीज केलं होतं. त्यामुळे संजय लीला भन्साळी शहाणपणाचा निर्णय घेऊन इन्शाअल्लाहची रिलीज डेट पुढे ढकलतील अशी आशा आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive