फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन ३’मधून शाहरुख बाहेर पडल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. झिरोच्या अपयशामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. पण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार डॉन ३ची शाहरुखला ऑफर दिली गेलीच नव्हती. ‘गली बॉय’ फेम रणवीरला या फ्रॅंचाईजीच्या तिस-या सिनेमासाठी विचारलं गेलं होतं. या सिनेमात कतरिना दिसणार असल्याचीही चर्चा आहे. रणवीर सोबतच रणबीरलाही हा सिनेमा ऑफर केला गेला होता.
पण दोघांनीही या सिनेमासाठी होकार कळवलेला नाही. हा सिनेमा सिक्वेल असणार कि प्रीक्वेल याचीही चर्चा सुरु आहे. हा सिनेमा प्रीक्वेल असेल तर याचं नाव ‘राईज ऑफ द डॉन’ असं असेल. याशिवाय अनेक इतर बॉलिवूड साईट्च्या संदर्भानुसार हा सिनेमा या फ्रॅंचाईजीचा शेवटचा सिनेमा असेल आणि त्याचं नाव ‘डॉन: द फायनल चॅप्टर’. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. वरील चर्चेवरून या सिनेमाचं एकंदरीत भविष्य अधांतरी आहे. चाहत्यांना मात्र ‘डॉन’च्या वापसीची आस आहे.