रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैनला एक्सेल एंटरटेनमेंट पुन्हा लाँच करणार

By  
on  

बॉलीवूड सिनेमांमध्ये आपल्या अनोख्या अभिनयाने रणबीर कपूरने सर्वांची मनं जिंकली आहेत. रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैन याने यशराज फिल्म्सच्या कैदी बंद या सिनेमामधून २०१७ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु हा सिनेमा कधी आला कधी गेला हे कोणालाच माहित नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरसुद्धा सपशेल अपयशी ठरला.

पीपिंगमून.कॉमला एक्सक्लूसिवरित्या अशी माहिती मिळाली आहे की फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी आपल्या एक्सेल एंटरटेनमेंटतर्फे अदार जैनला एका नव्या सिनेमामधून पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये लाँच करत आहेत. हा एक कॉमेडी सिनेमा असून सध्या या सिनेमाचं प्री प्रोडक्शनचं काम सुरु आहे. २०१९च्या जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

या सिनेमाशीसंबंधी अजून एक गोष्ट कळली असून या सिनेमाचं दिग्दर्शन पंकज सारस्वत हे करत असून दिग्दर्शन म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा असणार आहे. पंकजने याआधी टीव्हीवरील कॉमेडी शोजचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच 'अब तक छप्पन' आणि 'रिव्हॉल्वर राणी' यासारख्या बॉलीवूड सिनेमात त्यांनी अभिनय सुद्धा केला आहे.

एक्सेल एंटरटेनमेंटने याआधी सिद्धार्थ चतुर्वेदी आणि मौनी रॉय यांसारख्या कलाकारांना यशस्वीरित्या लाँच केलं आहे. त्यामुळे अदार एक्सेल एंटरटेनमेंटच्या माध्यमातून यशस्वी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. येत्या काही दिवसांमध्ये या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Recommended

Loading...
Share