'भाभी जी घर पर हैं' मध्ये आता नवी ‘गोरी मॅम’ म्हणून दिसणार नेहा पेंडसे?

By  
on  

कानपूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी सर्वांची लाडकी हिंदी मालिका म्हणजे 'भाभी जी घर पर हैं'. ही मालिका रसिक प्रेक्षकांना खुप प्रिय आहे. पण आता ‘गोरी मॅम’ म्हणून प्रसिध्द असलेली व अनिता भाभी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने ही मालिका सोडली आहे. मागच्याच महिन्यात तिने भाभीजी टीमचा निरोप घेतला.

आता निर्मात्यांपुढे नवी ‘गोरी मॅम’ आणण्याचं आव्हान आहेच. यापूर्वी अनेक नावंही चर्चेत होती. पण यात आपली मराठमोळी अभिनेत्री आणि हिंदी टेलिव्हिजनवरचा प्रसिध्द चेहरा नेहा पेंडसेचं नाव आघाडीवर आहे. निर्मात्यांची तिलाच पसंती असल्याचं कळतंय. 

नेहाचा हिंदीत ‘मे आय कम इन मॅडम’ हा शो चांगलाच गाजला . तिला आता भाभीजी मालिकेतला हा ‘गोरी मॅमचा’ रोल ऑफर झाला आहे, पण तिने अद्याप निर्मात्यांना होकार कळवला नसल्याचं समजतंय. परंतु चाहत्यांना मात्र ती गोरी मॅमच्या रुपात खुपच आवडेल यात शंका नाही. 

बिग बॉस 12 या हिंदी रिएलिटीची स्पर्धक असलेली नेहा पेंडसे गेल्यावर्षी पुण्यातील बिझनेसमन शार्दुल सिंग बयाससोबत लग्नबंधनात अडकली आहे. 
यापूर्वी दोन वर्षांआधी अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने ही मालिका सोडली होती. त्यानंतर बराच वादंग निर्माण झाला. आता अभिनेत्री शुभांगी अत्रे अंगुरी भाभी साकारते. 

 

Recommended

Loading...
Share