या अभिनेत्रीने शेअर केलेला बेबी बंपसह फोटो पाहून चाहते चक्रावले

By  
on  

माझ्या नव-याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. माझ्या नव-याची बायको या मालिकेतील जेनी या व्यक्तिरेखेने तिला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती दिली आहे. शर्मिलाने अलीकडेच एक फोटो शेअर केला. यामध्ये ती बेबी बंपसहित दिसते आहे. 

 

 

तिचा हा फोटो पाहून चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. पण शर्मिलाने एका गर्भवती महिलेच्या ऑडिशनसाठी हा लूक केल्याचं समोर आलं आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. शर्मिला म्हणते, ‘जेव्हा तुम्ही गर्भवती महिलेच्या ऑडिशनसाठी असा लूक करता त्यानंतर काही तास अशाच अस्वस्थेत राहून निवांतपणे सर्फिंगही करता, यालाच सुस्तपणाचा कळस असं म्हणतात’. हे ‘पेट’ योग्यप्रकारे बसवलं गेलं नाही. जगातील तमाम आयांना खुप प्रेम’

Recommended

Loading...
Share