By  
on  

Video : माधुरी आणि डॉ.श्रीराम नेनेंच्या किचनमध्ये आहे खास साबुदाण्याच्या खिचडीचा बेत

बॉलिवूडची धकधक गर्ल आणि सौंदर्यसम्राज्ञी माधुरी दीक्षित सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध पोस्ट व व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहायला तिला खुप आवडतं. अनेकदा माधुरी पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह विविध व्हिडीओज शेअर करत असते. महाराष्ट्राची मुलगी असलेल्या आपल्या मराठमोळ्या माधुरी दीक्षितने नुकतंच चाहत्यांसमोर सर्वांची आवडती साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी शेअर केली. तीसुध्दा पती डॉ. नेनेंच्या  साथीने. 

माधुरीच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांना उत्सुकता असते. त्यात तिने साबुदाण्याची खिचडी कशी करतात, हे दाखवल्यानंतर तर अवघा महाराष्ट्र तिच्यावर फिदा झाला असणार ह्यात शंका नाही. खरं त साबुदाण्याची खिचडी हा माधुरीचासुध्दा आवडता पदार्थ आहे. 

साबुदाण्याची खिचडीचा हा खमंग बेत माधुरीच्या किचनमध्ये शिजतोय, पण हे ऐकून तुम्हालाच भूक लागली ना ...असं थेट माधुरीच विचारतेय. 

 

 

 

 

माधुरीने तिची साबुदाण्याच्या खिचडीची खास रेसिपी चाहत्यांशी शेअर केलीय. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. त्यावर तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी पाहता येईल, पण तत्पूर्वी माधुरीने शेअर केलेल्या या धमाकेदार इन्स्टाग्राम पोस्टवर मात्र चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

यापूर्वीसुध्दा माधुरीने गणपती बाप्पाला निरोप देताना उकडीच्या मोदकांची रेसिपी शेअर केली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive