By  
on  

सुमित राघवनने दाखवून दिली आमिर खानची 'ती' चूक, जाणून घ्या

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या सिनेमांमबद्दल त्यातील भूमिकांबद्दल प्रचंड चोखंदळ  आणि जागरुक असतो हे आपल्या सर्वांनाच माहितीय. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो परिपूर्ण अभ्यास करुनच हात घालतो. भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेणा-या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार आमिर खानचं नाव आघाडीवर असतं. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमी आतुरता असते. 

पण याच आमिर खानकडून एक चुक घडलीय. बहुधा ती नकळतही असेल. पण कोणाच्याच ती कशी लक्षात आली नाही, हे विशेष. याच गोष्टीवर प्रकाशझोत टाकला आहे, तो मराठीतील प्रसिध्द अभिनेता सुमित राघवनने. सध्या टीव्हीवर आमिर खानची एका एपची जाहिरात झळकते आहे. यात आमिर खान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहे. यात तो आपला पोलिस शिपायाचं आडनाव 'शिंदे' ऐवजी 'शिंडे' असं उच्चारतोय. 

आमिरच्या ह्या अजब उच्चारावर आश्चर्य व्यक्त करत सुमित राघवनने सोशल मिडीयातून रोख-ठोक मत व्यक्त केलं आहे. सुमितच्या मते, या जाहिरातीची टीम स्क्रीप्ट राईटर, पोस्ट प्रोडक्शन यापैकी ही चुक कोणालाच खशी दिसली नाही...

तसंच सुमित पुढे, या ट्विटमध्ये सयाजी बघ रे बाबा..असंही म्हणतोय. 

 

 

 

खरंतर आमिरकडून ह्या चुकीची अपेक्षा नाही. मराठी भाषेवर आमिरचं प्रेम आहे. अनेकदा परिसंवादातही तो मराठीतून व्यक्त झालेला पाहायला मिळाला आहे. तसंच त्याने मराठीचं शास्त्रशुध्द शिक्षण दिवंगत ज्येष्ठ भाषा तज्ञ सुहास लिमये यांच्याकडून घेतलं आहे. याशिवाय पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमिरने महाराष्ट्रभर जनजागृतीही केली आहे. त्यामुळे मराठी भाषा आमिरला मुळीच नवीन नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive