By  
on  

किशोरी शहाणेंनी शेअर केली सास-यांची ही आठवण

अभिनेत्री किशोरी शहाणे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. अनेकदा त्या त्यांच्या अ‍ॅक्टीव्हीटीबाबत सोशल मिडियावर शेअर करत असतात.  आताही त्यांनी एक खास आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे. किशोरी यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. 

 

 

या फोटोमध्ये किशोरी यांचे सासरे बलराज वीज दिसत आहेत. बलराज हे अभिनेत्री स्मृती बिस्वास या अभिनेत्रीसोबत दिसत आहेत. बलराज यांनी बिमल रॉय यांच्या ‘पेहला आदमी’ या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील एक सीन किशोरी यांनी चाहत्यांशी शेअर केला आहे. किशोरी सध्या 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्या भवानी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. या मालिकेत किशोरी यांचा वेगळा लूक दिसतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive