By  
on  

आईच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडियावर सतत अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेक पोस्ट व व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहायला रितेशला खुप आवडतं. तसंच ब-याचदा तो ज्वलंत सामाजिक विषयांवरही भाष्य करतो. तर कधी पत्नी जेनेलियासोबतचे धम्माल व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करतो. पण आज रितेशने एक खुपच खास पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रितेशने आईसोबतचे अप्रतिम क्षण शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आज रितेश देशमुखची आई आणि राज्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने "आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खुप खुप प्रेम," असं रितेशने हे मायलेकाचे गोड फोटो शेअर करत म्हटलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आई Love You... Happy Birthday!

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

 

 

 

रितेश देशमुख आणि त्याच्या आईच्या ह्या क्युट फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive