अस्सल सौंदर्याची खाण आणि तितकीच सशक्त अभिनेत्री म्हणून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी स्मिता पाटील ह्या अभिनेत्रीने कमी कारकिर्दीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आजच्या पिढीलासुध्दा स्मिता पाटील यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तितकीच माहिती आहे. आज १७ ऑक्टोबर स्मिता पाटील यांचा वाढदिवस. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यामध्ये झाला. अवघ्या वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला.
आजच्या पिढीतील मराठीतील एक गुणी आणि प्रतिभसंपन्न अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष हे नाव डोळ्यासमोर येतं. अमृता सुभाष आणि स्मिता पाटील यांच्यात एक खास कनेक्शन आहे आणि अलिकडेच जोडलं गेलं आहे. ते पण ओढणीचं. तुम्ही म्हणाल ओढणीचं म्हणजे नेमकं कोणतं. तुम्हालासुध्दा हे जाणून घेतल्यावर आनंदच होईल.
अभिनेत्री अमृता सुभाष हिला स्मिता पाटील यांची ओढणी भेट म्हणून मिळाली आहे आणि ती ख-या अर्थाने भाग्यवान ठरलीय. ही ओढणी परिधान केलेला फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला होता व यासोबतची आठवणही चाहत्यांना सांगितली. स्मिता पाटील यांच्या ताईकडून तिला ही ओढणी भेट मिळाली आहे.
अमृता सुभाष हीने आतापर्यंत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अमृता सुभाषचं 'अस्तु' या सिनेमातील काम स्मिता पाटील यांच्या बहिणीला प्रचंड आवडलं. सिनेमाच्या प्रिमिअरच्या वेळी स्मिता पाटील यांची मोठी बहिण अनिता यांनी स्मिता पाटील यांची एक ओढणी अमृताला भेट म्हणून दिली. त्यावेळी त्यांनी अमृताला सांगितलं की, 'तू स्मीची (स्मिता पाटील) गोष्ट पुढे घेऊन जाशील असं मला वाटतंय. असंच मनापासून काम करं. जेव्हा तुला हे क्षेत्र सोडावसं वाटेल तेव्हा तू ही ओढणी फक्त तुझ्याकडे ठेवू नकोस. तर ही स्मी ची ओढणी अशा एका अभिनेत्रीला दे, जी स्मी ची गोष्ट पुढे घेऊन जाईल.