By  
on  

‘अन् मग मी सोडून त्रिशूळ, भाला.. हाती stethoscope धरला…’; तेजस्विनीचा डॉक्टरांना सलाम

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.   यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण यशाशक्ती घरातच राहून देवींचा हा उत्सव प्रत्येकजण साजरा करतोय. 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजात घडणाऱ्या घटनांवर अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. देवीच्या रुपातील पहिला फोटो तिने शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या माध्यमातून तिने डॉक्टर आणि अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे.करोना संकटात डॉक्टरच खरे देव आहेत, हे कोणीही मान्य करेल. 

सध्या देशावर करोनाचं संकट आहे. त्यामुळे या काळात गेल्या ४-५ महिन्यांपासून देशातील डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी सातत्याने रुग्णांची सेवा करत आहेत. करोनाशी कडवी झुंज देत आहेत.  त्यामुळे डॉक्टर हा देवाचाच एक अंश आहे असं सांगत तिने डॉक्टरांच्या कार्याला सलाम केलं.म्हणूनच, तेजस्विनीने पीपीई किटमधील एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रतिपदा : . . दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला... अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला... घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #doctors #nurses #wardboys #healthcareworkers #tejaswwini #gratitude

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

 

 

तेजस्विनी पोस्टमध्ये लिहते, “प्रतिपदा : दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला…
अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला…
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस, आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस” 

नवरात्री फोटोशूट करण्याची संकल्पना तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत आणली. आता अनेकजणं वेगवेगळ्या रूपांमधली फोटोशूट करत असतात. 2017 पासून तेजस्विनी पंडित दरवर्षी एका नव्याविषयासह नवरात्रीचे फोटोशूट करत असते. तेजस्विनी ह्याविषयी सांगते, “2017 ला आजूबाजूच्या परिस्थितीवर आपण काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटलं. आणि एक फोटोशूट केलं. सोशल मीडियावर फोटो येताच अनेकांनी पाठ थोपटली. आता तर ‘नवरात्रीत काय घेऊन येणार’ अशी चाहत्यांकडून आवर्जून विचारणा होऊ लागलीय. त्यामूळे हुरूप येतो आणि एक जबाबदारीचीही जाणीव असते. प्रत्येक वर्षी मी त्यावेळी मनात जे काही खदखद असते, ते नवरात्री फोटोशूटमधून व्यक्त होते, ह्या फोटोशूटमागे अर्थातच माझ्या टिमचा खूप सपोर्ट असतो.”

दरम्यान, तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी पीपीई किटमध्ये दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचं नवरात्री स्पेशल तेजस्विनीचं हे फोटोशूट चाहत्यांना आवडेस यात शंका नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive