By  
on  

नवं-कोरं रोमॅण्टिक गाणं रसिकांच्या भेटीला, पाहा Video

नवं-कोरं रोमॅण्टिक गाणं रसिकांच्या भेटीला  आलं आहे. योगेश तवार आणि उर्मिला जगताप हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. या गाण्याची निर्मिती योगेश तवार यांनी केली असून झी युवा संगीत सम्राट या पर्वाचा महाविजेता ठरलेल्या रवींद्र खोमणे यांनी हे गीत गायले आहे, तर प्रसाद गाढवे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला विपुल कदम यांनी संगीत दिलं आहे. याअगोदर योगेश तवार यांनी निर्मिती केलेलं तसेच युवा गायक रोहित राऊत यांनी गायलेलं मन मन हे गाणं सर्वांनाच आवडलं होतं.

योगेश तवार व उर्मिला जगताप हि एक नवी फ्रेश जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येतेय, अभिनयासोबतच योगेश तवार यांनी गाण्याचं कथानक व दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे, गाण्याच्या लोकशन पासुन ते फ्रेश लूक येण्यासाठी गाण्याच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे.

 

गाण्याचं छायाचित्रण व संकलन ह्या दोन गोष्टी राहुल झेंडे यांनी सांभाळल्या असून, लाईटस अक्षय वाघमोडे यांनी तर मेकअप हर्षद खुळे यांनी केला आहे, बाकी सर्व तांत्रिक जबाबदारी अशोक घुले व अक्षय कडू यांनी सांभाळली आहे.  “चिर्रर्रर्र बुंगाट” हे गाणं नक्कीच रसिकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive