By  
on  

चित्रपट महामंडळाची बदनामी करणाऱ्यांना कारवाईचा इशारा

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी  चित्रपट महामंडळाची बदनामी करणा-यांविरोधात कारवाईचा बडगा उचलणार असल्याचा इशारा दिला आहे. साखर, धनादेश चोरीची प्रकरणे घडली नसतानाही चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि विरोधकांनी  ती बनावट तयार केली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे काढून मला आणि चित्रपट महामंडळाला बदनाम करण्याचा कट विरोधकांनी आखला आहे, असा आरोप महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी  केला.

या विरोधात बैठक घेऊन महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि त्यांना साथ दिलेल्या विरोधकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. चित्रपट महामंडळाच्या गरजू सभासदांना करोना काळात देण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये अध्यक्ष आणि संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना राजेभोसले म्हणाले, की आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याची मोहीम उघडली आहे. महामंडळातील अनेक  गैरप्रकारांबद्दल त्यांनी यावेळी आरोपसुध्दा केले आहेत. 

याची गंभीर दखल घेऊन संचालक मंडळाची लगेचच बैठक घेऊन उपाध्यक्ष आणि विरोधकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive