By  
on  

सोनाली खरेची लेक या माध्यमातून करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण

अनेक सिनेमा-मालिकांमधील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. सोनाली उत्तम अभिनेत्री आहेच याशिवाय फिटनेस फ्रिकही आहे.  सोनाली सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. आताही तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने लेक अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं शेअर केलं आहे.

 

 

सोनालीची लेक सनाया एका शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका साकारणार आहे. ‘ब्लड रिलेशन’ हे या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. ‘येत्या दिवाळीत ब्लड रिलेशन ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित होणार आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सई देवधरने केले आहे’. या कॅप्शनसहित तिने पोस्टरही शेअर केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive