By  
on  

'छुमंतर' हा lock down नंतर परदेशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट

'छूमंतर' या हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणा-या आगामी सिनेमाच्या  चित्रीकरणासाठी अनेक कलाकार गेले महिनाभर लंडनमध्ये होते. अनलॉक काळात सुरु असलेल्या त्यांच्या या शूटींग शेड्यूलमधून ते चाहत्यांशी लंडनमधले अपडेट्स शेअर करत होते. या सिनेमात अभिनेत्री प्रार्थाना बेहरे आणि रिंकू राजगुरु यांच्यासोबतच अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनासुध्दा झळकणार आहेत. याशिवाय नाळ सिनेमामुळे महाराष्ट्राचा लाडका झालेला चैत्या फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेसुध्दा भूमिका साकारतोय. ही सर्व सिनेमाची टीम नुकतीच लंडनहून मायदेशी परतली आहे. 

परदेशात लॉकडाऊनंतर चित्रित झालेल्या ह्या पहिल्या मराठी सिनेमाबद्दल अभिनेता सुव्रत जोशी व्यक्त झाला आहे. त्यानेच एका पोस्टद्वारे सिनेमा कसा महिन्याभरात घडला हे उलगडलं आहे.

सुव्रत सांगतो." आधीच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला या वर्षी करोना मुळे अजूनच अवघड परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. अशा वेळी अनेक निर्मात्यांनी धाडस दाखवून पुन्हा व्यवसायात उडी घेतली आहे. मी ऑक्टोबर मध्ये भारतात परत यायच्या तयारीत असताना मला नितीन वैद्य यांचा फोन आला आणि त्यांनी मला लंडन मधेच थांबायला सांगितले. आपण एक नवीन चित्रपट करतोय तोही दोन भाषांमधे! आताच्या भयंकर अस्थिर परिस्तिथीत भारतातून येऊन लंडन मध्ये चित्रपट करायची तयारी दाखवायला केवळ धाडसच नाही तर चिकाटी आणि पद्धतशीर नियोजन अतिशय आवश्यक होतं. एक चूक आणि अख्खी (किंवा अर्धी) फिल्म डब्यात! अश्या परिस्थितीत अकलूज वरून रिंकू,अमरावतीहून श्रीनिवास पोकळे, बडोद्याहून प्रार्थना आणि ऋषी तसंच वल्लरी मुंबईतून लंडनला आले. भारतीय लोक हे नियोजनाच्या बाबतीत जर अघळपघळ असतात आणि चित्रपटातील लोक याला अपवाद नाहीत. लंडन अगदी विरुद्ध, नियम म्हणजे नियम. पण यावेळी आमच्या चित्रपटाचा सेट दृष्ट लागेल असा शिस्तबद्ध होता. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी प्लॅन बी तयार ठेवण्यात आला होता. पर्याय नव्हता तो नटांना! ते एकदा दिसले की बदलता येणार नव्हते,तसेच त्यांचा व्हिसा आणि परवानग्या वगैरे घोळ होतेच. त्यामुळे त्यांनी प्रचंड काळजी घ्यायची होती. Crew, म्हणजे मेक अप, कॅमेरा, निर्मिती या सर्व विभागातील लोकांनी येण्याचे धाडस दाखवले आणि नियम पाळत स्वतःचे कार्यभारही सांभाळले. एका महिन्यात 'छुमंतर' मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतून पूर्ण झाला. आता मराठी लोकांना हा मराठीत तर इतर भाषिक लोकांना हिंदीतून हा चित्रपट बघायला मिळेल. मला आमचे दिग्दर्शक समीर जोशी आणि छायाचित्रकार मिलिंद जोग यांचेही विशेष अभिनंदन करावेसे वाटते. त्यांनी सगळ्या संघाची मोट बांधून ठेवली. कलाकारांनी पण विशेष काळजी घेतली. सुट्टी मिळाली तरी नियमांचे पालन करत,मोहाला बळी न पडता सगळे मुकाट हॉटेलात बसून राहिले.

'छुमंतर' हा lock down नंतर परदेशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्याचा भाग असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. एरवी मी पडद्यामागे घडलेल्या गोष्टींना फार महत्व देत नाही,त्यात आलेल्या 'आव्हानांचे' भांडवल करणेही मला आवडत नाही. प्रत्येक कामात अशी संकटे येतात आणि कलाक्षेत्रात कला महत्वाची! पण तरीही यावेळी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. समोरील अनिश्चितता अभूतपूर्व होती. आता लंडन मध्ये पुन्हा लॉक डाउन जाहीर झाला आहे पण आमचा सर्व संच तिथे काम पूर्ण करून आपापल्या गावी सुखरूप परतला आहे.याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो आहे."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आधीच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला या वर्षी करोना मुळे अजूनच अवघड परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. अशा वेळी अनेक निर्मात्यांनी धाडस दाखवून पुन्हा व्यवसायात उडी घेतली आहे. मी ऑक्टोबर मध्ये भारतात परत यायच्या तयारीत असताना मला नितीन वैद्य यांचा फोन आला आणि त्यांनी मला लंडन मधेच थांबायला सांगितले. आपण एक नवीन चित्रपट करतोय तोही दोन भाषांमधे! आताच्या भयंकर अस्थिर परिस्तिथीत भारतातून येऊन लंडन मध्ये चित्रपट करायची तयारी दाखवायला केवळ धाडसच नाही तर चिकाटी आणि पद्धतशीर नियोजन अतिशय आवश्यक होतं. एक चूक आणि अख्खी (किंवा अर्धी) फिल्म डब्यात! अश्या परिस्थितीत अकलूज वरून रिंकू,अमरावतीहून श्रीनिवास पोकळे, बडोद्याहून प्रार्थना आणि ऋषी तसंच वल्लरी मुंबईतून लंडनला आले. भारतीय लोक हे नियोजनाच्या बाबतीत जर अघळपघळ असतात आणि चित्रपटातील लोक याला अपवाद नाहीत. लंडन अगदी विरुद्ध, नियम म्हणजे नियम. पण यावेळी आमच्या चित्रपटाचा सेट दृष्ट लागेल असा शिस्तबद्ध होता. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी प्लॅन बी तयार ठेवण्यात आला होता. पर्याय नव्हता तो नटांना! ते एकदा दिसले की बदलता येणार नव्हते,तसेच त्यांचा व्हिसा आणि परवानग्या वगैरे घोळ होतेच. त्यामुळे त्यांनी प्रचंड काळजी घ्यायची होती. Crew, म्हणजे मेक अप, कॅमेरा, निर्मिती या सर्व विभागातील लोकांनी येण्याचे धाडस दाखवले आणि नियम पाळत स्वतःचे कार्यभारही सांभाळले. एका महिन्यात 'छुमंतर' मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतून पूर्ण झाला. आता मराठी लोकांना हा मराठीत तर इतर भाषिक लोकांना हिंदीतून हा चित्रपट बघायला मिळेल. मला आमचे दिग्दर्शक समीर जोशी आणि छायाचित्रकार मिलिंद जोग यांचेही विशेष अभिनंदन करावेसे वाटते. त्यांनी सगळ्या संघाची मोट बांधून ठेवली. कलाकारांनी पण विशेष काळजी घेतली. सुट्टी मिळाली तरी नियमांचे पालन करत,मोहाला बळी न पडता सगळे मुकाट हॉटेलात बसून राहिले.'छुमंतर' हा lock down नंतर परदेशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्याचा भाग असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. एरवी मी पडद्यामागे घडलेल्या गोष्टींना फार महत्व देत नाही,त्यात आलेल्या 'आव्हानांचे' भांडवल करणेही मला आवडत नाही. प्रत्येक कामात अशी संकटे येतात आणि कलाक्षेत्रात कला महत्वाची! पण तरीही यावेळी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. समोरील अनिश्चितता अभूतपूर्व होती. आता लंडन मध्ये पुन्हा लॉक डाउन जाहीर झाला आहे पण आमचा सर्व संच तिथे काम पूर्ण करून आपापल्या गावी सुखरूप परतला आहे.याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. #sula #sulaspeaks

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

सर्वांनाच ह्या सिनेमाच्या फर्स्ट लुक सोबतच कथानकाचीसुध्दा उत्सुकता आहे. लंडनमध्ये ह्या कास्टने चित्रीकरण पू्र्ण केल्याने चाहत्यांना् या आगामी सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत.  

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive