By  
on  

राहूल देशपांडेंचंही असंही Work from home, बनवला सुरेख आकाशकंदील

दिवाळी अगदी उंब-याशी आली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीची तयारी करण्यात गुंतला आहे. गायक राहूल देशपांडे यांनीही दिवाळी एका वेगळ्या कारणाने खास बनवली आहे. राहूल यांनी पहिल्यांदाच स्वत:च्या हाताने आकाशकंदील बनवला आहे. अर्थातच या काही त्यांना पत्नी नेहा आणि लेक रेणुकाची मदत झाली आहे.

 

 

हा आकाशकंदील बनवताना मला खुप मजा आली असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी नेहा आणि रेणुकासोबतचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. राहूल दिवाळीनिमित्त ‘घेई छंद’ या संगीत कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत सुबोध भावे आणि महेश काळेही दिसणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive