By  
on  

दिवाळीसाठी अभिनेत्री नम्रता संभेरावने फ्लाँट केला हा ज्वेलरी ट्रेंड

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आपल्या कॉमिक सेन्सने घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. आपल्या परफॉर्मन्समध्ये हटके एनर्जी ओतत ती तो परफॉर्मन्स हटके करून टाकते. या कार्यक्रमात नम्रता विविध भूमिका साकारताना दिसते. सादरीकरणाची पद्धत , उत्तम विनोदाचं टायमिंग या सगळ्याच गोष्टीतून नम्रता अनेकांची फेव्हरिट कॉमेडियन बनली आहे.

 

नम्रता सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते. आताही तिने एक खास फोटो शेअर केला आहे.

 

यामध्ये ती ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीचा ट्रेंड फॉलो करताना दिसते आहे. नथ ते अंगठी पर्यंत ती ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी फ्लाँट करते आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive