By  
on  

‘देव देव्हा-यात नाही’ या सिनेमाच्या लोगोचं अनावरण, मेघना नायडूही दिसणार सिनेमात

विक्रम गोखले, सुहासिनी मुळे, मेघना नायडू आणि रीना अगरवाल यांची भूमिका असलेला ‘देव देव्हा-यात नाही’ या सिनेमाच्या लोगो अनावरणाचा ऑनलाईन सोहळा नुकताच पार पडला आहे. नितीन उपाध्याय यांच्या ऑडबॉल मोशन पिक्चरने दिवाळीनिमित्त चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडूचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. प्रवीण बिरजे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सामाजिक विषयावर हा सिनेमा आधारलेला आहे. आपल्या मराठी पदार्पणाबाबत अभिनेत्री मेघना नायडू म्हणते, ‘ मी या टीमकडून खुप काही शिकले आहे. विक्रम सर आणि सुहासिनी मॅडमकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. 2021मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive