By  
on  

अभिनय बेर्डे दिग्दर्शित शॉर्ट फिल्म रसिकांच्या भेटीला, पाहा Video

दिवंगत मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डेने अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केलीय. ती सध्या काय करते या आपल्या पदार्पणातील सिनेमातूनच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता अभिनयने दिग्दर्शक म्हणूनसुध्दा पदार्पण केलं आहे. 

अभिनय बेर्डे दिग्दर्शित 'क्लोस टू यू' ही शॉर्टफिल्म नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे.  ही वेबसिरीज प्रेम आणि नातेसंबंधावर भाष्य करते. प्रिया बेर्डेसुध्दा या फिल्मची सहनिर्माती आहे. चाहत्यांना ही शॉटफिल्म आवडल्याचं कॉमेंटसमध्ये पाहायला मिळतंय. 

 

 अभिनयच्या ह्या दिग्दर्शनातील पदार्पणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर दरम्यान अभिनय सध्या लंडनमध्ये आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी काम करतोय. त्याने दिवाळीसुध्दा तिथेच साजरी केली. चाहत्यांना त्याच्या .या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive