By  
on  

आणि जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'चं शूटींग झालं पूर्ण, जाणून घ्या

नाटक, सिनेमा आणि वेबसिरीजमधून अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांवर आपली छाप पाडलीय, मराठी च नव्हे पण हिंदीतह जितूने रसिकांची मनं जिंकली.   हरहुन्नरी अभिनेता जितेंद्र आता एका नव्या परिघात प्रवेश करतो आहे. जितेंद्र आता सिनेमाच्या निर्मितीमध्ये उतरला आहे. ‘गोदावरी’ नावाच्या सिनेमाची तो सहनिर्मिती करतो आहे. या सिनेमाचं नुकतंच शूटींग पूर्ण झालं आहे. 

'गोदावरी' सिनेमाचं शूटींग पूर्ण झाल्यानिमित्त जितूने एक खास पोस्ट शेअर केली. तो म्हणतो, " खूप आनंद होतोय या क्षणी..जो विचार केला होता आणि जे मनातल्या मनात रेखलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक सुंदर काहीतरी घडलंय. सर्व श्रेय @nikmahajan आणि आमच्या संघाचं!!" 

 

 

दिग्दर्शक निखील महाजन या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. तसंच अनलॉकमध्ये हा सिनेमा पूर्णपणे शूट करण्यात आला आहे. 

'गोदावरी'  या सिनेमात नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले आणि संजय मोने हे कलाकार आहेत. दिवंगत  अभिनेता, दिग्दर्शक निशिकांत कामत यांना जितूने हा सिनेमा समर्पित केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive