By  
on  

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाबाबत प्रशांत दामले यांनी शेअर केली ही महत्त्वाची आठवण

प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची हटके केमिस्ट्री असलेलं नाटक म्हणजे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट. या नाटकाने रंगभूमीवर पुन्हा एकदा बहार आणली. प्रशांतदामले आणि कविता मेढेकरसह अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख आणि पराग डांगे हे कलाकार या नाटकात रंगत आणत आहेत. आतापर्यंत या नाटकाचे 385 प्रयोग पार पडले आहेत.

प्रशांत दामले यांनी या नाटकाबाबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ आजच्याच दिवशी आमचं "एका लग्नाची पुढची गोष्ट" ह्या नाटकाचा शुभारंभ झाला होता.. कॉवीड मुळे नाटक 385 प्रयोगांवर वर थांबलय. क्रिकेटचा सामना चालु असताना अचानक पाऊस आला तर सगळे कसे pavilion मधे जाऊन बसतात तसें आम्ही बसलोय.. पाऊस थांबला रे थांबला की सुरु. भेटू लवकरच.. पण सांभाळून, काळजी घेऊन. मग येणार ना??????? चाहत्यांनाही पुन्हा एकदा रंगभूमीवर हे नाटक पाहण्याची इच्छा असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive