By  
on  

Video : गायक राहुल देशपांडे यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त गायलं 'बोलावा विठ्ठल' गाणं

प्रसिध्द-गायक संगीतकार राहुल देशपांडे हे आपल्या स्वरांनी चाहत्यांना नेहमीच मंत्रंमुग्ध करतात. ते सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात. लॉकडाऊनच्या काळापासून ते सतत सोशल मिडीयाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांसाठी विविध गाण्यांची पर्वणी घेऊन येतात. 

आज कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्ताने राहुल देशपांडे यांनी खास विठ्ठल भक्तीत लीन झालेल्या भक्तांसाठी बोलावा विठ्ठल हे गाणं गायलं.  संत तुकारामांनी लिहलेल्या या अभंगाला संगीत शिरोमणी किशोरीताई आमोणकर यांनी स्वरबध्द केलं. हेच गाणं राहुल देशपांडे यांनी स्वत:च्या स्वरसाजात चाहत्यांसमोर सादर केलं, 

 

 

 

चाहत्यांनीसुध्दा सोशल मिडीयावरुन राहुल देशपांडे यांना या खास  गाण्यासाठी मनमुराद दाद दिली असून कौतुकाचा वर्षाव केला आहे. राहुल देशपांडे नेहमीच विविध गायन प्रयोगाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत त्यांना म्युझिकल ट्रिट देतात.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive