By  
on  

हा आहे लॉकडाऊननंतर रिलीज होणारा पहिलाच सिनेमा, जाणून घ्या

लॉकडाऊनमुळे सर्व सिनेसृष्टी जणू थांबली होती. सरकारच्या नियमावलींचे पालन करत आता हळूहळू सुरळीत होताना दिसत आहे. मोठे सिनेमेही लवकरच प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता चित्रपटगृहेही हळूहळू कात टाकताना दिसत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवुया बँड बाजा' या बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होण्यास  सज्ज झाला आहे. 

 

 

 अभिनेता चिन्मय उदगीकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. चिन्मयने नुकतीच या संदर्भात पोस्ट शेअर केली होती. आपल्या पोस्टमध्ये चिन्मय म्हणतो, ‘वाजवूया बँड बाजा' ११ डिसेंबर २०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रात थिएटर मध्ये प्रदर्शित होणारा लॉकडाऊन नंतरचा पहिलाच मराठी सिनेमा !! ११ डिसेंबर २०२० ला बॅंड बाजा वाजवायला नक्की या. पण येताना मास्क लावूनच या!’ एकंदरीत चिन्मय या सिनेमाबाबत भलताच उत्साही आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive