पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणा-या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अवघं कलाविश्व हळहळलं. पवित्र रिश्ता मालिकेत मानव ही व्यक्तिरेखा सुशांत साकारायचा. ह्यात मानवच्या आईची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारली होती. ही मालिका त्या काळी प्रचंड गाजली.त्या मालिकेमुळे दोघांमध्ये खरोखरंच आई मुलाचं नातं निर्माण झालं होतं. सुशांत नेहमीच उषाताईंना आई म्हणूनच ऑफस्क्रीनसुध्दा हाक मारायचा.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी सुशांतच्या आठवणीने नुकत्याच भावूक झाल्या आणि त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. अलिकडेच त्यांनी झी रिश्ते या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली . यावेळी त्यांनी आपला पुरस्कार सुशांतला समर्पित केला. शिवाय त्याच्या आठवणी सांगताना त्यांना रडू देखील कोसळलं. त्यांचे ओघळणारे अश्रू पाहून सभागृहातील वातावरण भावूक झालं. उपस्थित सेलिब्रिटींचे डोळेसुध्दा पाणावले.
उषा ताईंचा हा भावूक करणारा पुरस्कार सोहळ्यातला व्हिडीओ सध्या सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसह संपूरण सोशल मिडीयावर लक्ष वेधून घेतोय.