By  
on  

अज्या-शितलीच्या 'चाहूल' गाण्याला अल्पावधितच 1 मिलियन व्ह्यूज

सध्या सोशल मीडियावर 'चाहूल' या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. रोमँटिक गाण्याची क्रेझ रसिक प्रेक्षकांना अधिक असून 'चाहूल' या रोमँटिक गाण्याने तर साऱ्या गाणप्रेमींना मंत्रमुग्धच करून सोडलंय. फार कमी दिवसांत या गाण्याने तब्बल १ मिलियन प्रेक्षकांवर अधिराज्य केले आहे. याशिवायही या गाण्याचा आस्वाद विविध माध्यमांद्वारे प्रेक्षकवर्ग घेताना दिसत आहे. 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री शिवानी बावकर म्हणजेच आपले शीतली आणि आज्या यांची जोडगोळी या गाण्यातून रोमँटिक अंदाजात पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली. 

प्रेम व्यक्त करण्याची भावना या गीतातून सफर घडवणारी होती. शिवाय या गाण्यात प्रेमाच्या भावनेबद्दल तसूभरही उणीव भासू दिली नाही अगदी गावरान आणि या गाण्याला साजेशा अशा नजराण्यांची कुठेही कमतरता आढळू दिली नाही आणि याचेच बक्षीस म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षकांनी या गाण्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे असे म्हणणे वावगे  ठरणार नाही. 'एव्ही प्रॉडक्शन'सह 'मराठी म्युझिक टाऊन' या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलेवहिले गाणं आहे.

'एव्ही प्रॉडक्शन' आणि 'मराठी म्युझिक टाऊन'प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे तर गाण्याचे बोल  राहुल थोरात यांचे असून संगीतकार आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

ओंकार माने दिग्दर्शित 'चाहूल' या गाण्यातून शिवानी आणि नितीशची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहण्यास रंजक ठरली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive