By  
on  

जयडी फेम ही अभिनेत्री दिसणार या भूमिकेत, जाणून घ्या

'लागिरं झालं जी' मालिकेतील जयडी म्हणून अभिनेत्री पूर्वा शिंदे घराघरांत पोहचली. डान्सिंग क्वीन आमि चला हवा येऊ द्याच्या कॉमेडी स्पेशल भागात झळकल्यानंत ती आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 

‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका अलिकडेच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच ही मालिका लोकप्रिय ठरतेय. शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर ह्यात महत्त्वपू्ण पम्मी हे पात्र साकारतेय, आता यात जयडी फेम पूर्वा शिंदेसुध्दा झळकणार आहे. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये सुरु आहे.

 

 

 

मालिकेतील अश्विनी हिच्या ‘गेली सासरला, पाय तिचा घसरला’ या आवडत्या मालिकेतील राजनंदिनीची भूमिका पूर्वा साकारतेय. राजनंदिनी म्हणजे अत्यंत सोज्वळ, गोड, सगळ्यांना सांभाळून घेणारी, आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श बायको आणि सतत चेहऱ्यावर हास्य असणारी अशी आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive